हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम आपण टाळावा का?

बैठका काढणे ही शरीराची एक अत्यंत मूलभूत हालचाल असते. या व्यायामप्रकाराला व्यायामाचा राजा असेही म्हटले जाते, कारण शारीरिक ताकदीची आवश्यकता असलेल्या प्रत्येक खेळात या व्यायामप्रकाराचा अनेक दशकांपासून वारसा चालत आलेला आहे. शरीरसौष्ठवापासून ते कुस्तीपर्यंत कुणाच्याही दैनंदिन व्यायामात बैठका हा एक महत्त्वाचा व्यायाम असतो. यात शरीराचे कंबरेपासून खालचे अवयव आणि शरीराच्या मध्यवर्ती भागातील स्नायू समाविष्ट असतात. […]